VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल यामध्ये त्याला स्वत:ला थोडीफार दुखापत झालीच पण सोबत झाडंही पडलं. असं असलं तरी हा व्हिडीओ पाहून मात्र तुम्ही पोट धरुन हसाल. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की नेटकरी पोट धरून हसत आहे. झोका घेण्याच्या नादात तरुणाची जी अवस्था झाली आहे ते पाहून प्रत्येक जण हसत आहे. तुम्हीही पाहा व्हिडीओ.
VIDEO झोका खेळताना कधी उंच झोका घेण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन झोक्यावरील व्यक्ती खाली पडते. तसा झाडाला बांधलेला झोका हा सेफ असतो, तो तुटण्याची सहसा शक्यता नसते. मात्र वजनदार व्यक्ती वारंवार क्षमतेपेक्षा जास्त वजन टाकत असेल तर काय होणार हे सांगायला नको. असंच काहीसं या तरुणासोबत झालं. झोका घेण्याची हौस त्याला चांगलीच महागात पडली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक जाडजूड तरुण छोट्याशा झाडाला बांधलेल्या झोक्यावर झोका घेत आहे. तसं पाहायला गेलं तर तो झोका या तरुणासमोर अगदीच छोटा आहे, त्यामुळे या झोक्यावर बसणं त्यानं टाळलं पाहिजे होतं. मात्र तरुण झोक्यावर बसला दोन झोके घेतले अन् पुढच्याच क्षणी अख्खं झाड अंगावर घेतलं.