New tips उशीर झाला चिडचिड होतेय…मनासारखं काही होत नाही चिडचिड होतेय…चिडचिडेपणा हा सध्या आपल्या प्रत्येकाचा दररोजच्या जीवनाचा भाग झालाय. तुम्हीही खूप चिडचिड करता मग डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी खाली दिलेले उपाय जरूर करून पहा. मात्र जर जास्त प्रमाणाच चिडचिड होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
व्यायाम
चिडचिड होत असल्यास दररोज थोडा व्यायाम करा. यामध्ये १० मिनिटं पायी चालणं तसंच ४५ मिनिटं वर्कआऊट तुम्ही करू शकता. जर तुम्ही आठवड्यातून किमान ३ वेळा व्यायाम केला तरी तुमच्या चिडचिडेपणामध्ये फरक जाणवेल.New tips
बागकाम करा
बागकाम केल्याने हात खराब होतील या विचाराने अनेकजण हे काम टाळतात.
मात्र बागकाम केल्याने मेंदूकडून येणाऱ्या एका विशिष्ट केमिकलमध्ये वाढ होते. यामुळे चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते. तसंच हे काम केल्याने व्यायाम देखील होतो.
मेडिटेशन
मेडिटेशन करणं केव्हाही उत्तम. मेडिटेशन केल्याने तुमचं लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित राहतं. यामुळे डोक्यातील विचार आपोआप निघून जातात. परिणामी चिडचिडेपणा हा कमी होतो.
योग
योग हा मेडिटेशनचाच एक भाग आहे. योगामध्ये असणाऱ्या काही पद्धती किंवा आसनं यामुळे शरीरातील स्नायू आणि टिश्यू ताणले जातात. यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रणात राहून चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, योग करतवेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.New tips
मसाज
मसाज करणं हात, पाय, पाठ यामधील स्नायू आणि टिश्यूंसाठी उत्तम असतं. यामुळे स्नायू ताणले जातात. परिणामी ताण आणि चिडचिडेपणा येत नाही.New tips