Petrol diesel new price लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, केंद्र सरकारने गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होतील,
असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे.
पेट्रोल-डिझेल दरकपातीमुळे देशातील ५८ लाखांहून अधिक मालवाहतूकदारांसह ६ कोटी कार आणि २७ कोटी दुचाकीस्वारांना फायदा होईल. तसेच देशातील महागाई कमी होण्यास मदत होईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.