IMD Rain Alert राज्यात पुन्हा दोन दिवस अवकाळी पाऊस राहणार

IMD Rain Alert राज्यामध्ये पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. कमाल तापमान हे सरासरी राहणार असून, किमान तापमानात वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूरला ४०.२ तर सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात १५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

राज्यात 25,26 बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 24 ते 28 , तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. महाराष्ट्रातदेखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

लातूर, नांदेड, भंडारा, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा वगळता इतर ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. विदर्भात किमान तापमानात वाढ झाली आहे. कोकणात मात्र किंचित घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक

राज्यातील कमाल व किमान तापमान

  • पुणे 36.0 15.6
  • सोलापूर 40.2 23.2
  • मुंबई ३०.१. 22.1
  • रत्नागिरी 31.3. 21.3
  • छ. संभाजीनगर 36.2. 18.3
  • नांदेड. 36.6 22.8
  • अकोला. 37.9. 21.4
  • नागपूर. 36.2 21.6

Leave a Comment