Gharkul Yojana घरकुलांना मिळाली मंजुरी; दोन महिन्यांत १९,१५१ घरकुल. तुम्ही अर्ज केला का?

Gharkul Yojana : सर्वांना घरे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्यात पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, पारथी आणि मोदी आवास योजना राबविण्यात येत आहेत. त्या त्या योजनेनुसार पात्र लाभार्थी लाभ घेत आहेत. या योजनांमधून अनेकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

शासनाच्या उद्दिष्टानुसार घरकुलांना मंजुरी मिळाल्यानंतर बांधकामांच्या टप्यानुसार आवास योजनेच्या निकषाप्रमाणे अनुदान मिळते. गत दोन महिन्यात बीड जिल्ह्यात मोदी आवास, रमाई व शबरी आवास अंतर्गत १९ हजार १५१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. गरजू पात्र लाभार्थीनी संबंधित यंत्रणेकडे चौकशी करून घरकुलासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. घरकुलासाठी १ लाख २० हजार, शौचालयासाठी १२ हजार व मनरेगातून शासन निर्देशानुसार १८ ते २२ हजारांपर्यंत लाभ पात्र लाभार्थीना मिळतो. बांधकाम साहित्य व मजुरी महागल्याने आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची सांगितले आहे.

रमाई घरकुल आवास योजना :

शबरी आवास योजनेंतर्गत गरजू आदिवासी कुटुंबांना १ लाख २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय दिले जाते. या योजनेतून जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना घरे मिळाली आहेत. रहिवासी असावा. अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे याआधी कोणत्याही प्रकारचे पक्के घर नसावे.

मोदी आवास योजनेंतर्गत इतर मागास प्रवर्गासाठी राज्य शासनाने स्वतःची मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे. घरकुल योजनेपासून वंचित, इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना लाभ मिळतो.

अर्ज कोठे,कसा कराल?

आवास योजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तर शहरी विभागासाठी नगरपरिषद, नगरपंचायतमार्फत करण्यात येते.

Leave a Comment