Gas Cylinder Subsidy : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या महिन्याच्या अखेरीस बजेट सादर करतील. घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडीबाबत काय निर्णय होणार याकडे उज्ज्वला योजनेसह सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना मध्यंतरी मोठा दिलासा मिळाला होता.
Budget 2024 : घरगुती सिलेंडरची सबसिडीबाबत महत्त्वाचा निर्णय; बजेटमध्ये होणार का मोठी घोषणा?
गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत मोठा निर्णय
सरकार लकरच केंद्रीय बजेट सादर करेल. यामध्ये LPG सबसिडीविषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारी तेल कंपन्यांना (OMC) जवळपास 9,000 कोटी रुपयांची LPG सबसिडी देऊ शकते. उज्ज्वला योजनेतंर्गत ही आर्थिक मदत देण्यात येईल. यामुळे देशातील 10 कोटींहून अधिक उज्ज्वला ग्राहकांना मोठा फायदा होईल. सरकार प्रत्येक बजेटमध्ये तेल कंपन्यांना LPG सबसिडी देते. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त एलपीजी गॅस मिळतो. यावर्षी अंतरिम बजेटमध्ये पण सरकारने OMCs ला आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ईटी नाऊने सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, आगामी बजेटमध्ये सरकार ही सबसिडी कायम ठेवणार आहे.
सरकारकडून 300 रुपयांची सबसिडी
पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत (PMUY) सरकार लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपयांची सबसिडी देते. या योजनेला सरकारने अगोदरच मार्च 2025 पर्यंत वाढीव मुदत दिली आहे. 1 मार्च, 2024 पर्यंत 10.27 कोटींहून अधिक PMUY लाभार्थी असल्याची सरकार दप्तरी नोंद आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात (2024-25) मध्ये OMCs ला 2,000 कोटींचे अनुदान
दिले आहे.