HSC Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख (Maharashtra Board 12th Results 2024 Date) जाहीर करण्यात आलीय. बोर्डाकडून बारावीचा निकाल (Hsc Result 2024 Date) 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलीय.
HSC Result बोर्डाकडून 21 मे रोजी दुपारी १ वाजता 12 वी चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन निकाल जाहीर करण्याआधी सकाळी अकरा वाजता बोर्ड पत्रकार परिषद घेणार आहे. यात विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. बारावीची परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत झाली. बारावीच्या परीक्षेला राज्यात १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. उद्या निकाल जाहीर करताना परीक्षेला बसलेले विद्यार्थी, उत्तीर्ण प्रमाण, विभागानुसार निकाल पत्रकार परिषदेत सांगण्यात येणार आहे.HSC Result
राज्य मंडळाकडून फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. याचे निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याचं समोर आलंय. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.HSC Result
बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून निकालाची प्रिंटही काढता येईल. सर्व विषयांचा सविस्तर निकाल संकेतस्थळावर दिसेल. ऑनलाइन निकाल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पूनर्मुल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. उत्तर पत्रिकेच्या पूनर्मुल्यांकनासाठी आधी उत्तर पत्रिकेची झेरॉक्स कॉपी बोर्डाकडून घ्यावी लागेल. त्यानंतर पाच दिवसात शुल्क भरून अर्ज करावा लागणार आहे.HSC Result