HSC Result बारावीचा निकाल आज जाहीर होणार

निकल पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा 👈

Maharashtra Board HSC Result : पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) आज (21 मे 2024) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येईल. यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.HSC Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12th Exam) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार उद्या दुपारी जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC Exams) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. HSC Result

कुठे पाहता येणार निकाल?

mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

http://results.targetpublications.or

Leave a Comment

Close Help dada