RBI भारत देशांमध्ये दि.09 नोव्हेंबर 2016 रोजी विद्यमान पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी चलनातुन 1000/- रुपये व 500/- रुपयांच्या नोटा चलनातुन बाद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता . त्यानंतर चलनात नविन 500/- रुपयांच्या व 2000/- रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या .
RBI च्या क्लिन नोट पॉलिसी च्या अंतर्गत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे , एका सर्वेनुसार दोन हजार रुपयांची नोट todays news ही वापरण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले . शिवाय दोन हजार रुपये ही रक्कम मोठी असल्याने या नोटाचा गैरवापर व मोठ्या प्रमाणात चलनाची सहज वाहतुक केली जात होती .एकीकडे जगांमध्ये डिजिटल करन्सीचा वापर होत आहे तर भारतामध्ये आत्तापर्यंत नोटांचाच वापर होत असल्याने , डिजिटल करन्सीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
2000/- रुपयांची नोट तयार झाल्यापासूनच या नोटावर तज्ञांकडून बंद करण्याचा सल्ला देण्यात आलेला होता , कारण 2000/- रुपयांच्या नोटासारख्या नकली नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आढळुन आल्या आहेत .यामुळे देशांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातुन तातडीने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत आरबीआयकडून गाईडलाईन्स जाहीर करण्यात आलेले आहे.