Traffic Rules: शहर वाहतूक शाखेने गत तीन महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणान्या ९३६० चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या चालकांना तब्बल ७७ लाख ३६ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेषतः वाहनांच्या नंबर प्लेटवरील दादा, मामा, काकांमुळेही वाहनधारकांच्या खिशाला नाहक डाळ बसली आहे.
उद्योगनगरी असलेल्या जालना शहरासह हद्दीतून दैनंदिन हजारो वाहने ये-जा करतात. एमआयडीसी, सिड्स कंपनीसह मुख्य बाजारपेठेतील होलसेल दुकानांतून, किरकोळ दुकानांतून साहित्य खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. शहरातील विविध मार्गावर वाहने
चालविणाऱ्या चालकांकडून मात्र नियमांना बगल दिली जात आहे. नियमांना धाब्यावर बसवून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून
कारवाई केली जात आहे. गत तीन महिन्यांतच ९३६० चालकांवर ७७ लाख ३६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या
१३७९ जणांना ६ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ट्रिपलसिट दुचाकी चालविणाऱ्या १६२२ जणांवर १६ लाख २२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला
. नंबरप्लेटवर काका, मामा, दादा यासह इतर शब्द टाकणे, नंबरप्लेट अस्पष्ट असणे, नंबर प्लेटच नसणे आदी नियम मोडणाऱ्या १३०१ चालकांवर १० लाख ८६ हजार