Weather update मान्सूनची महाराष्ट्रात दमदार एन्ट्री झाली आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून आज उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह